सोलापूर - नागरिकांनी वीजबिल न भरल्यास सक्तीने वसून करा. असे आदेश ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे. ऊर्जा मंत्र्यांच्या या आदेशाचा निषेध करण्यासाठी सोलापुरात आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. वीज महामंडळाच्या मुख्य कार्यालयात करण्यात आलेल्या या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान आठवड्याच्या आत वीजबिल माफ न केल्यास एक लाख वीज ग्राहकांना सोबत घेऊन मोर्चा काढू, असा इशारा वंचितचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे.
वंचित बहुजन आघाडी सोलापूरच्या वतीने लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे या मागणीसाठी मंगळवारी महावितरणच्या मुख्य कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांना दिले. आठवडाभरात वीजबिल माफीसाठी तात्काळ नियोजन करावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक लाख वीज ग्राहकांना सोबत घेऊन महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा यावेळी वंचितचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिला.
ठिय्या आंदोलनामुळे महावितरण कार्यालय परिसरात गोंधळ