सोलापूर -सांगोला मतदारसंघामध्ये ज्येष्ट नेते गणपत आबा देशमुख यांच्या विरोधात सर्वात जास्त वेळा निवडणूक लढवणारे आमदार शहाजीबापू पाटील हे देशमुख यांच्या निधनानंतर भावनिक झाले.
प्रतिक्रिया देताना आमदार शहाजीबापू पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील हेही वाचा -सकर माशामुळे उजनी धारणातील स्थानिक माशांचे आयुष्य धोक्यात, मत्स्य व्यवसायिक हैराण
विरोधकांनाही आपलेसे करणारे आबा...
माजी मंत्री गणपत आबा देशमुख हे राज्याच्या राजकारणातील संयमी व शांत नेतृत्व म्हणून ओळखल्या जात होते. आबाच्या जाण्याने सांगोला तालुक्यासह जिल्ह्यामध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
सांगोला तालुक्याला न्याय देण्याचा केला होता प्रयत्न..
शेकापचे ज्येष्ट नेते गणपतराव देशमुख यांनी आमदारकीच्या काळात सांगोला तालुक्याच्या निर्मितीचा प्रयत्न केला आहे. सांगोला तालुक्याची दुष्काळी पट्टा म्हणून ओळख पुसण्यात आबा देशमुख यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याकडून गेल्या वीस ते पंचवीस वर्षांत राजकारणातले धडे गिरवले, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -आषाढी वारी सोहळा : वाखरी पालखी तळावर मानाच्या पालख्यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज