महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sharad Koli On CM: गुहावटीवरून आल्यावर शिंदे आणि मिंधे गटाच सरकार पडणार; शरद कोळींचा हल्लाबोल - Chief Minister Eknath Shinde

Sharad Koli On CM: राज्यासाठी शिवाजी महाराजांनी अनेक कार्य केले. त्या शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल वादग्रस्त विधान करतात, पण हे शिंदे आणि मिंधे गट राज्यपालांची पाठराखण करत आहे. गुहावटीला जाताय तर याद राखा, गुहावटीवरून आल्यावर तुमचं सरकार पडणार असल्याचा दावा युवा सेनेचे राज्य विस्तारक(उद्धव ठाकरे गट) शरद कोळी यांनी केले आहे.

Sharad Koli On CM
Sharad Koli On CM

By

Published : Nov 26, 2022, 12:17 PM IST

सोलापूर:युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी हे पुन्हा एकदा बरसले आहेत. ज्या हिंदुत्वचा मुद्दा समोर करून राज्यात सत्ता परिवर्तन करून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे आणि मिंधे गटाची सरकार आली. त्या सरकारने हिंदुत्व खुंटीला अडकवला आहे. या राज्यासाठी शिवाजी महाराजांनी अनेक कार्य केले. त्या शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल वादग्रस्त विधान करतात, पण हे शिंदे आणि मिंधे गट राज्यपालांची पाठराखण करत आहे. गुहावटीला जाताय तर याद राखा, गुहावटीवरून आल्यावर तुमचं सरकार पडणार असल्याचा दावा युवा सेनेचे राज्य विस्तारक(उद्धव ठाकरे गट) शरद कोळी यांनी केला आहे.

देवीच्या दर्शनासाठी जातायत याद राखा तुमचं सरकार पडणार:एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी करून सूरतमार्गे सर्व आमदार गुवाहाटीला गेले होते. गुहावटीत एकनाथ शिंदेंसह सर्व आमदारांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतले होते. नाट्यमय घडामोडीनंतर गोवा मार्गे हे सर्व आमदार महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळात दाखल झाले होते. सत्ताबदल करत शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आलं.

ठाकरेगट लक्ष ठेवून:आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde त्यांचे इतर मंत्री आणि आमदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जात आहेत. एकनाथ शिंदें यांचे कुटुंबही यावेळी त्यांच्यासोबत आहे. या सर्व प्रकरणावर ठाकरेगट लक्ष ठेवून आहे. ठाकरे गटाचे युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी सडकून टीका केली आहे.

शहाजी बापू पाटलांवर सडकून टीका:युवा सेना राज्य विस्तारक शरद कोळी यांनी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटलांवर सडकून टीका केली आहे. शहाजी बापूंचं तोंड गटारीसारखे आहे. त्यामुळे ते संजय राऊतांवर नेहमी टीका करतात. शाहजीबांपूनी अगोदर आपल्या बुडाखालचा अंधार बघावा आणि मग इतरांना बोलावं, असं शरद कोळी म्हणाले. ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदें यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. तेच हिंदुत्व आज तुम्ही खुंटीला टांगलं आहे, असे शरद कोळी टोला लगावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details