माढा (सोलापूर) -माढा तालुक्यातील सुलतानपूर गावचे नाव राहुलनगर असे नामांतर करण्याची प्रकिया आता अखेरच्या टप्प्यात आली असून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने लेखी पत्राद्वारे सुलतानपूरचे राहुलनगर असे नाव करण्यासाठी आवश्यक त्या बदलाच्या नोंदी कार्यालयाच्या अधिपत्याखालील सर्व अभिलेखामध्ये घेण्यात याव्यात, असे निर्देश देण्यात आले असून आवश्यक त्या गाव बदलाच्या नोंदी करुन अहवाल सादर करण्याचे पत्रात म्हटले आहे.
तब्बल १२ वर्षांनी हुतात्मा जवानाच्या नावे होणार 'या' गावाचे नामांतर
माढा तालुक्यातील सुलतानपूर गावचे नाव राहुलनगर असे नामांतर करण्याची प्रकिया आता अखेरच्या टप्प्यात आली असून लवकरच गावाचे नाव बदलणार आहे.
.. त्यामुळे आता येत्या काही दिवसात 'या' गावचे नाव असणार राहुलनगर -
जिल्हाधिकारी कार्यालयाचे महसूलचे नायब तहसीलदार संदीप लटके यांच्या स्वाक्षरीच्या पत्राच्या प्रती उपविभागीय अधिकारी कुर्डूवाडी, तहसीलदार माढा, गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, गावकामगार तलाठी यांना देण्यात आल्या आहेत. राहुलनगर नाव करण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी यापूर्वीच मिळाली होती. सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे तो विषय रखडला गेला होता. तो आता मार्गी लागला आहे.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या राहुल शिंदे यांचे स्मरण राहण्यासाठी गावचे नाव सुलतानपtर ऐवजी राहुलनगर करण्याची राहुलचे पिता सुभाष शिंदे यांचेसह ग्रामस्थांची मागणी होती. या मागणी प्रश्नी कुटूबिंयासह शहीद राहुल शिंदे संस्थेचे अध्यक्ष दतात्रय शिंदे यांनी प्रशासनाचे उंबरठे झिजवले. कित्येकदा मंत्रालयात हेलपाटे देखील मारले.
शहीद राहुल शिंदे यांचे वडील सुभाष शिंदे यांनी म्हटले की, अनेक वर्षे या मागणीसाठी आम्ही पाठपुरावा करीत राहिलो. अखेर आता कुठे यश आले आहे. शहीदाच्या प्रती शासनाने तत्परतेने काम करणे अपेक्षित आहे. गावचे नाव बदलाच्या हालचाली खालीपर्यंत पोहचल्या फार आनंद वाटला. गावचे नाव राहुलनगर होणे हीच माझ्या राहुलसाठी खरी श्रद्धांजली ठरली.