सोलापूर -बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत असताना अनेकांना ऑक्सिजनअभावी भटकंती करावी लागत आहे. रुग्णांची ही गरज ओळखून आदर्श उद्योग समूहाने ग्रामीण रुग्णालयास 21 ऑक्सिजन सिलेंडर देऊन आदर्शवत उपक्रम राबविला आहे.
आदर्श समुहाकडून ग्रामीण रुग्णालयाला 21ऑक्सिजन सिलेंडर ग्रामीण रुग्णालयाची हीच गरज ओळखून दिले 21 ऑक्सिजन सिलेंडर
बार्शी तालुक्यासह लगतच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा, वाशी या तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक सामाजिक संस्था मदतीसाठी समोर येत आहेत. यामुळे गरजूंना तर मदत होत आहे तसेच उपचारामध्येही आता हातभार लागत आहे. यामध्ये आदर्श उद्योग समूहाने मदतीचा हात पुढे करत ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन देऊ केले आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांवरील उपचारासाठी हे सिलेंडर उपयोगी ठरणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिकतर रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. शिवाय ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना खासगी दवाखान्याची पायरी चढावी लागते. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ग्रामीण भागातील रुग्णालयात ऑक्सिजनची टंचाई भासत होती. ग्रामीण भागातील रुग्णालयांची ही गरज ओळखून मदत केली असल्याचे उद्योग समूहाचे रवींद्र राऊत यांनी सांगितले. या ऑक्सिजन सिलेंडरची मदत ही योग्य वेळी झाली असून अनेक गरजू रुग्णांना याचा फायदा होणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी शीतल भोपलकर यांनी सांगितले.
हेही वाचा - राज्यपाल सचिवालयात विधानपरिषद नामनियुक्त सदस्यांची यादीच उपलब्ध नाही!