पंढरपूर- अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने वारकऱ्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आज 6500 हापूस आंब्यांची व आंब्याच्या पानांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. त्यामुळे गाभाऱ्यास मनमोहक असे आमराईचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यासाठी खास रत्नागिरी येथून 6500 हापूस आंबे व विविध फळे मागविण्यात आले आहेत. ही आमराई आरास पुणे येथील विठ्ठल भक्त विनायक शेठ काची यांनी केली आहे.
अडीच लाख रुपयांचा खर्च
विठ्ठलाचा गाभारा, चौखांबी आदी ठिकाणी आंब्याची आरास करण्यात आल्याने श्री विठ्ठल आमराईत उभा असल्याचा भास होत असून. देवाचे हे लोभस रुप आज अधिकच खुलून दिसत आहे. विठ्ठलाप्रमाणे रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आंब्याची व विविध फळांची मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पपई, डाळिंब, सफरचंद, मोसंबी, संत्री, कलिंगड, खरबूज, अनानस यांसारख्या साडेसहा हजार फळांचा वापर करण्यात आला आहे. यासाठी सुमारे अडीच लाख रुपये खर्च आला आहे.