सोलापूर - 'दुष्काळ गंभीर, शिवसेना खंबीर' ही टॅगलाईन घेऊन शिवसेनेने
'दुष्काळ गंभीर, शिवसेना खंबीर'; आदित्य ठाकरेंची बळीराजाच्या वेदनांवर फुंकर? - thackeray
दुष्काळात सरकारी योजना लालफितीत अडकलेल्या असताना युवा सेनेच्या आदित्य ठाकरे यांच्या दुष्काळी दौऱ्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दौऱ्यात सेनेने ४ ट्रक चारा अन २०० टाक्यांचे वाटप केले. सेनेच्या या मदतीप्रती फूल नाही तर किमान फुलांची पाकळी हीच शेतकऱ्यांची भावना आहे.

या दौऱ्याच्या निमित्ताने ८० टक्के समाजकारण अन २० टक्के राजकारण म्हणणारी शिवसेना अप्रत्यक्षपणे गावाकडच्या आपल्या राजकीय अस्तित्वाला युवा नेतृत्वाच्या माध्यमातून उभारी देण्याचा प्रयत्न करत आहे. पण आदित्य ठाकरे यांनी मुंबईला पोहोचल्यावर सरकार दरबारी किती पाठपुरावा केला किंवा सेना मंत्र्यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवले यावरच या दौऱ्याचे फलित ते स्पष्ट होईल.
आदित्य ठाकरें