करमाळा(सोलापूर) - सैराट चित्रपटात 'सल्या'ची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहचवत आहे. अरबाज हा मुळचा करमाळा तालुक्यातील जेऊर येथील रहिवासी आहे.
कोरोनामुळे संकटात सापडलेल्या गरजूंना सैराटमधील 'सल्या'कडून मदत - arbaz shaikh help
सैराट चित्रपटामुळे 'सल्या' या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या शेखची संवेदनशीलता रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरली आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारी कित्येक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. या पार्श्वभूमीवरच अरबाज शेख मदतीला धावून आला आहे.
सैराट चित्रपटामुळे 'सल्या' या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या शेखची संवेदनशीलता रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरली आहे. सहजसुंदर अभिनयाने सल्याची भूमिका करून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अरबाजने कोरोना अडचणीच्या काळात गरजूंना जीवनावश्यक मदत पुरवून त्यांचे हृदय जिंकले आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारी कित्येक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. उत्पन्नाचे साधन नसल्याने काहींवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवरच अरबाज शेख मदतीला धावून आला आहे.
करमाळा तालुक्यातील जेऊर व परिसरातील गरजू कुटुंबाची यादी तयार करून अरबाज त्यांना आवश्यक असलेले किराणा साहित्य घरी नेऊन देत आहेत. आगामी काळात आजारी व्यक्तींची माहितीही गोळा करत त्यांना औषधोपचार पुरविण्याचे नियोजनही त्याने केले आहे. कोरोना पार्श्वभूमीवरील सध्याचा काळ मजूरवर्गासाठी अडचणीचा आहे. यावेळी त्यांना मदत देणे, हाच मानवधर्म आहे. समाजातील दानशूरांनी गरजूंसाठी शक्य ती मदत पुरविली आहे, अशी प्रतिक्रिया अरबाज शेख याने व्यक्त केली आहे.