महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूर तालुक्यात तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, एकावर पोक्सो कलमांतर्गत कारवाई - पंढरपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पंढरपूर तालुक्यातील एका गावामध्ये तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या एका नराधमास पोलिसांनी अटक केली आहे.

pandharpur police
पंढरपूर पोलीस स्टेशन

By

Published : Feb 3, 2021, 3:15 PM IST

पंढरपूर -पंढरपूर तालुक्यातील एका गावामध्ये तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या एका नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सुखदेव भोंगे (वय 49) असे संशयित आरोपीचे नाव आहे. भोंगे विरोधात पोक्सो कलमांतर्गत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

खाऊचे आमिष दाखवून अत्याचार

पंढरपूर तालुक्यातील एका गावात खाऊचे आमिष दाखवून सुखदेव भोंगे याने तीन अल्पवयीन मुलींना घरात बोलावले व त्या मुलींसोबत अश्लील चाळे करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातील एका मुलीने सुखदेव याच्या तावडीतून सुटका करून घेत आपल्या घरी जाऊन झालेला सर्व प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर वडिलांनी गावातील नागरिकांसोबत भोंगे याच्या घरी जाऊन दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली. नागरिकांनी भोंगे याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या प्रकरणी संशयित आरोपी सुखदेव भोंगे याच्याविरोधात पोक्‍सो कायद्याअंतर्गत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, यानिमित्ताने पंढरपूर तालुक्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details