पंढरपूर:मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिक पालन करीत नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनाने धडक कारवाई सुरु केले आहे. यामध्ये 19 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत शहरात 215 जणांवर कारवाई करण्यात आली असून. त्यांच्याकडून 1 लाख 7 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती प्रभारी उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
विना मास्क फिरणाऱ्यावर पंढरपूरमध्ये कारवाई, 1 लाख 7 हजाराचा 500 रुपयाचा दंड वसुल - मास्क न वापरणाऱ्यां विरोधात कारवाई
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिक पालन करीत नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनाने धडक कारवाई सुरु केले आहे.
नगरपरिषदेची कारवाई : 20 हजार रुपये दंड वसूल
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे उल्लघंग करणाऱ्या शहरातील दुकानदार, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते आदी वर नगरपालिकेच्या वतीने 170 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांचेकडून 20 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदे कडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मंदीर परिसर, प्रदक्षिणामार्ग तसेच शहरातील आवश्यक ठिकाणचे निर्जंतुकीरण करण्यात येत आहे. तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, विनामास्क घराबाहेर पडू नये असे आवाहनही त्यांनी केले.