महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर करमाळ्यात कारवाई - करमाळा अनधिकृत वाळू उपसा कारवाई

मांगी तलाव परिसरातून अनधिकृत वाळू उपसा आणि वाहतूकी होत असल्याच्या अनेक तक्रारी मिळाल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसीलदार समीर माने यांच्या पथकाने मध्यरात्री अचानक धाड टाकून ही कारवाई केली. या कारवाईमध्ये 3 ब्रास वाळू आणि अंदाजे 32 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Unauthorized sand extraction
अनधिकृत वाळू उपसा

By

Published : May 30, 2020, 3:03 PM IST

सोलापूर(करमाळा) - तालुक्यातील मांगी तलावाच्या परिसरात वडगावच्या बाजून अनधिकृतरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या सात ट्रॅक्टर आणि एक पिकअपवर कारवाई करण्यात आली. मांगी तलाव परिसरातून अनधिकृत वाळू उपसा आणि वाहतुकी होत असल्याच्या अनेक तक्रारी मिळाल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसीलदार समीर माने यांच्या पथकाने मध्यरात्री अचानक धाड टाकून ही कारवाई केली.

या कारवाईमध्ये 3 ब्रास वाळू आणि अंदाजे 32 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱया सात ट्रॅक्टरपैकी चार ट्रॅक्टर हे प्रत्यक्षात ताब्यात घेतले असून तीन ट्रॅक्टर व एक पिकअप हे अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. पळून गेलेले वाहन चालक बिरू नामदेव शिंदे, सचिन अशोक काळे, परशुराम अशोक शिंदे आणि एका अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तहसीलदार समीर माने यांच्यासह संतोष गोसावी, तलाठी विनोद जवणे, राजेंद्र राऊत, हनुमंत ढवळे, सतिष बिजले, साईनाथ आडगटाळे, अजय चव्हाण यांनी सहभाग घेतला.

तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवरती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नदीलगत असणाऱ्या गावातील नागरिकांनी प्रशासनाला याची माहिती देऊन सहकार्य करावे. अनाधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतूक संबंधी ग्रामदक्षता समिती अधिक कार्यक्षमपणे काम करेल याकडे लक्ष दिले जाईल, असे करमाळ्याचे तहसीलदार समीर माने यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details