सोलापूर - शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विना मास्क लावून फिरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच डबल सीट, मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशी घेऊन रिक्षा प्रवास, चार चाकी वाहनामधील प्रवाशी संख्या अशी तपासणी शहरात करण्यात आली. मंगळवारी शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या सातही पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. मार्च महिन्यापासून ते आजपर्यंत 45 हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून 50 लाखांचा दंड ही वसूल करण्यात आला आहे.
मास्क न वापरणे पडले महागात..! आतापर्यंत 45 हजार वाहनचालकांवर कारवाई - solapur traffic police action
सोलापूर शहरात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मंगळवारी शहराच्या विविध भागात पोलिसांच्या वतीने विशेष मोहिम राबवली. विना मास्क शहरात फिरणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.
सोलापूर शहरात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मंगळवारी शहराच्या विविध भागात पोलिसांच्या वतीने विशेष मोहिम राबवली. विना मास्क शहरात फिरणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. शहर व ग्रामीण पोलीस यांनी शहर व जिल्ह्यातील नागरिकांना वेळोवेळी आवाहन करूनही कोरोनाची भीती न बाळगता वाहनचालक बेशिस्त व नियमांचे उल्लंघन करत आहेत. अशा 45 हजार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मार्च पासून ते आजतागायत म्हणजेच चार महिन्यात 50 लाखांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक एस. जाधव यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे. या विशेष मोहिमेमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन रात्रंदिवस झटत आहे. फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, या उद्देशाने दुचाकीवरून डबल सीट प्रवास करण्यावर बंदी करण्यात आली आहे. रिक्षामध्ये दोनच प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, शहर प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या वतीने शहरात कारवाईचा बडगा उचलला आहे. मार्च महिन्यांपासून ते जूनपर्यंत सोलापूर शहर व जिल्ह्यात दुचाकी, चार चाकी व तीन चाकी अशा 45 हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामधून 50 लाखांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. कोरोनाची व्याप्ती कमी करण्यासाठी व त्याची साखळी तोडण्यासाठी आणखी कडक कारवाई करण्याची गरज आहे.