महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Anil Parab on ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेतली जाणार नाही - परिवहनमंत्री अनिल परब - Anil Parab Solapur PC

एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतर त्यांवर बडतर्फची कारवाई केली आहे. आता ही कारवाई मागे घेतली जाणार नाही, अशी भूमिका परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. ( Anil Parab on ST Workers ) सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ( Anil Parab on Solapur Visit )

Anil Parab
अनिल परब

By

Published : Jan 7, 2022, 5:06 PM IST

Updated : Jan 7, 2022, 5:33 PM IST

सोलापूर - एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक आणि राज्याचे मोठे नुकसान होत आहे आहे. एसटी कर्मचाऱ्यांना एकदा नाही तर चार वेळा संधी देण्यात आली. मात्र, अद्यापही अनेक एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत. निलंबनानंतर त्यांवर बडतर्फची कारवाई केली आहे. आता ही कारवाई मागे घेतली जाणार नाही, अशी भूमिका परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. ( Anil Parab on ST Workers ) सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ( Anil Parab on Solapur Visit )

माध्यमांशी बोलताना परिवहन मंत्री अनिल परब

55 हजार कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे -

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. कर्मचाऱ्यांना सरकारकडून वेगवेगळे प्रस्ताव दिले असतानाही अनेक कर्मचारी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामावर परतत असले तरी अनेक कर्मचारी अजूनही कामावर आलेले नाहीत. आता एसटी महामंडळाने एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या चालकांची करारपद्धतीने नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे .तर दुसरीकडे 55 हजार संपकऱ्यांना नोटीस बजावली आहे.

हेही वाचा -Kadam Vs Parab : 'किरीट सोमैयांना, अनिल परबांच्या रिसोर्टसंदर्भातील कागदपत्रे मी पुरवली'

अनिल परब शिर्डीत -

परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासह अन्य मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपावर अद्याप तोडगा निघाला नाही आहे. राज्य सरकारने पगारवाढ देऊन सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. ( ST Workers Strike ) त्यामुळे हा संप मिटावा ही विनंती घेऊन मागच्या महिन्यात परिवहन मंत्री अनिल परब शिर्डीत पोहोचले. ( Transport Minister Anil Parab in Shirdi ) मंत्री परब यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. तसेच हा संप लवकर मिटावा, यासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली होती.

Last Updated : Jan 7, 2022, 5:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details