पंढरपूर (सोलापूर) -जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा जोर धरला आहे. या निवडणुकीदरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अकलूजमधून 62 जणांना, तर पंढरपूर तालुक्यातून 134 जणांना हद्दपारीच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुका शांततेच्या मार्गाने होण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
पंढरपूर तालुक्यातील 134 आरोपींना हद्दपारीची नोटीस -
पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये व मतदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ नये, यासाठी पंढरपूर तालुक्यातील प्रमुख गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 134 जणांना हद्दपार करण्यात आले आहे. त्यातील तालुक्यातील करकंब व पंढरपूर तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या गावांमधील गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. ही हद्दपारीची कारवाई अल्प काळासाठी असणार आहे.