महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुन्हेगार आसिफ तिम्मापुरे जिल्ह्यात दोन वर्षांसाठी तडीपार

जेलरोड पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुन्हेगार आसिफ तिम्मापुरे यास सोलापूर शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.

आसिफ तिम्मापुरे
आसिफ तिम्मापुरे

By

Published : Jul 11, 2020, 4:54 AM IST

सोलापूर - जेलरोड पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असेलेला आसिफ आयुब तिम्मापुरे (वय 38 वर्षे, रा. आंबेडकर नगर, तालुका पोलीस ठाणया मागे) याला सोलापूर पोलीस आयुक्तांनी शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.

गुडी वसुलीसाठी आसिफ तिम्मापुरेची ओळख होती. गुडी वसुली ही एक सांकेतिक भाषा आहे. शहरातील पाकीटमार राहतात. हे पाकिटमार जिथे-जिथे चोरी करतात त्यातील 10 टक्के कमिशन आसिफला आणून देत होते. याला चोर पे मोर असेच म्हणावे लागेल. आसिफ तिम्मापुरे याच्यावर जेलरोड पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हागारीवर आळा बसावा यासाठी जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जफर मोगल, सहायक पोलीस निरीक्षक सचिन पवार त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त (परिमंडळ) यांच्याकडे पाठवला होता. तो मंजूर झाला असून त्याला तडीपार करण्यात आले आहे.

गुडी म्हणजे काय

आसिफ तिम्मापुरे हा अनेक चोरट्यांना आश्रय देत होता, अशी चर्चा आहे. तो चोरीसाठी अनेकांना प्रोत्साहित करत होता व चोरीच्या रकमेतील 10 टक्के कमिशन म्हणून घेत होता, अशा प्रकारने त्याने मोठी माया देखील जमवल्याची चर्चा आहे.

हेही वाचा -सोलापुरातील 'लॉकडाऊन'बाबत आज अधिकाऱ्यांकडून निर्णय, पालकमंत्र्यांनी दिली जबाबदारी

ABOUT THE AUTHOR

...view details