सोलापूर -तिरुपती बालाजी मंदिरातील पूजेचे साहित्य पुरवण्याचे तीन हजार कोटींचे रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. त्यातील 130 कोटी रुपये देतो, अशी बतावणी करून दोन कोटी 78 लाख रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार अकलूज येथे घडला आहे. आंबादास उर्फ आण्णा सायबू ओरसे (रा. राऊतनगर, अकलूज) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा अकलूज पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
माहिती देतना पोलीस निरीक्षक तिरुपती ट्रस्टच्या साहित्याची दाखवले आमिष
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाशराज शेषमलजी जैन (वय 64 वर्षे, रा. अहमदाबाद) यांना 29 जून, 2019 ते 7 ऑक्टोबर, 2021 पर्यंत आंबादास ओरसे याने तिरुपती बालाजी मंदिरांमध्ये पूजा साहित्य पुरवण्याचे काम मिळाले आहे. ते काम तीन हजार कोटी रुपयांचे आहे. त्यामध्ये प्रकाश जैन यांना 130 कोटी रुपये देतो, असे आमिष अंबादास ओसरेने दाखवले.
दोन कोटी 78 लाख रुपयाला घातला गंडा
प्रकाश राज जैन यांनी अंबादास ओसरे याला रोख व आरटीजीएस माध्यमातून 2 कोटी 58 लाख रुपये दिले. तर मदन मिरजकर यांच्याकडूनही 15 लाख रुपये, असे एकूण 2 कोटी 78 लाख रुपये उकळले. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे काम होत नसल्याचे दिसून येतात. प्रकाश जैन यांनी आंबादास ओसरे यांच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र, पैसे मागितल्यास बायकोवर बलात्कार करण्याची धमकी आंबादासने दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.
अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रकाश राज जैन यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच. त्यांनी अकलूज पोलीस ठाण्यांमध्ये धाव घेत अंबादास ओरसे याच्याविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अंबादास रामपुरे याला काही तासातच अटक केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी दिली.
हेही वाचा -अजित पवारांच्या बहिणी 'जरंडेश्वर'मध्ये भागीदार; शरद पवारांना किरीट सोमैयांचे खुले आव्हान, म्हणाले..