पंढरपूर (सोलापूर) - अकलूज जवळील माळेवाडी येथे अपघात झाला. यात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. छाया पांडुरंग दांडगे (वय 45 वर्षे, आई) व श्रुती पांडुरंग दांडगे (वय 18 वर्षे, मुलगी) अशी मृतांची नावे आहेत.
आईला दवाखान्यात नेताना ट्रकची धडक
पंढरपूर (सोलापूर) - अकलूज जवळील माळेवाडी येथे अपघात झाला. यात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. छाया पांडुरंग दांडगे (वय 45 वर्षे, आई) व श्रुती पांडुरंग दांडगे (वय 18 वर्षे, मुलगी) अशी मृतांची नावे आहेत.
आईला दवाखान्यात नेताना ट्रकची धडक
श्रुती आईला दवाखान्यात घेऊन जात होती. यावेळी मोटारसायकलला मालवाहू ट्रकने धडक दिली. त्यामुळे मायलेकीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर श्रुतीचा भाऊ गंभीररीत्या जखमी झाला आहे. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात मालवाहू ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अपघात इतका भीषण होता की...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकलूज-वेळापूर रस्त्यावरील माळेवाडी येथे मालवाहू ट्रकने वेळापूरच्या दिशेने येणाऱ्या मोटारसायकलला जोरात धडक दिली. या धडकेमध्ये वेळापूर येथील रहिवासी असणाऱ्या छाया पांडुरंग दांडगे (वय 45) व मुलगी श्रुती पांडुरंग दांडगे (वय 18) यांचा ट्रकखाली आल्यामुळे चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला. मुलगा ओमकार पांडुरंग दांडगे (वय 20 वर्षे) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी अकलूज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की मायलेकीचा अक्षरशा चेंदामेंदा झाला आहे. दरम्यान, मालवाहू ट्रक चालक शिवशंकर हादीबसप्पा (कर्नाटक) याच्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.