सोलापूर- 4 हजारांची लाच घेताना सोलापुरातील पोलिसाला अटक करण्यात आली आहे. पकडलेले वाहन सोडून देण्यासाठी आणि महिन्याला ठराविक रक्कमेसाठी छोटा हत्ती हे वाहन जप्त केले होते. यामध्ये पोलीस हवालदार अब्दुल सत्तार महिबूब पटेल यांना लाचलुचपत विरोधी पथकाने ४ हजार २०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
पोलिसाला लाच स्वीकारताना लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले - लाचलूचपत पथक
4 हजारांची लाच घेताना सोलापुरातील पोलिसाला अटक करण्यात आली आहे. पकडलेले वाहन सोडून देण्यासाठी आणि महिन्याला ठराविक रक्कमेसाठी छोटा हत्ती हे वाहन जप्त केले होते.
छोटा हत्ती हे वाहन सोडून देण्यासाठी आणि वाहन चालविण्यासाठी महिन्याला हप्ता देण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. सोलापूर शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या अब्दुल पटेल यांनी संबंधित व्यक्तीचा छोटा हत्ती हे वाहन पकडले होते. मागील 4 दिवसांपासून हे वाहन जेलरोड पोलीस ठाण्यामध्ये ठेवले होते. पकडलेले वाहन छोटा हत्ती, हा प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येत होता. हे वाहन प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यासाठी महिन्याला 5 हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली होती. तडजोडी अंती महिन्याला 4 हजार 200 रुपये हप्ता देण्याचे ठरले होते.
या बाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागात देण्यात आली. या तक्रारीची खात्री केल्यानंतर वाहतूक पोलीस कार्यालयात सापळा रचण्यात आला आणि पोलिसाला 4 हजार 200 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. जेल रोड पोलिसामध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.