महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ACB action : पोलीस निरीक्षकांच्या नावाने दीड लाखांची लाच मागणाऱ्या दोघांना अटक एसीबीची कारवाई - bribe in name of police inspector

सोलापूर एसीबी युनिटने कारवाई करत दोन इसमांवर गुन्हा दाखल करुन कारवाई केली (ACB action arrested two accused) आहे. युवराज भीमराव राठोड (वय 37 वर्ष,रा जुळे सोलापूर), साजन रमेश हावळे (वय 36 वर्ष,रा मंगल रेसिडेन्सी,जुळे सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपींची नावे (accused demanded bribe in name of police) आहेत.

ACB action
एसीबीची कारवाई

By

Published : Nov 22, 2022, 1:01 PM IST

सोलापूर : सोलापूर एसीबी युनिटने कारवाई करत दोन इसमांवर गुन्हा दाखल करुन कारवाई केली (ACB action arrested two accused) आहे. युवराज भीमराव राठोड (वय 37 वर्ष,रा जुळे सोलापूर), साजन रमेश हावळे (वय 36 वर्ष,रा मंगल रेसिडेन्सी,जुळे सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयीत आरोपींची नावे (accused demanded bribe in name of police) आहेत. हे दोघे पोलीस निरीक्षक आमच्या परिचयाचे आहेत. असे भासवून दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. एसीबीच्या पडताळणीमध्येदोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया देताना गणेश कुंभार उपअधीक्षक एसीबी सोलापूर युनिट

पोलीस निरीक्षकांच्या नावाने लाच :सोलापुरातील एका पन्नास वर्षीय महिलेविरोधात तक्रारी अर्ज विजापूर नाका पोलीस ठाणे येथे दाखल केला होता. संबंधित महिलेला या दोघांनी मिळून समजावून सांगितले होते की, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आमच्या परिचयाचे आहेत. तुमच्या विरोधात कारवाई करू देणार नाही. त्यासाठी दीड लाख रुपये लागतील अशी मागणी केली होती. अँटी करप्शन सोलापूर युनिटने हे सर्व संभाषण रेकोर्ड करून पोलीस निरीक्षकांवर पाळत ठेवली होती. पण पोलीस निरीक्षक हे या जाळ्यात अडकलेच नाहीत. अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन खाजगी व्यक्तींवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले (bribe in name of police inspector in Solapur) आहे.



पोलीस निरीक्षक परिचयाचे :सोलापुरातील एका महिले विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात अर्ज दाखल झाला होता. त्याचा तपास करून ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होणार होता. पण युवराज राठोड आणि साजन हावळे यांनी जुळे सोलापुरातील सावन हॉटेलसमोर संबंधित महिलेला बोलावून दीड लाख रुपये लाच मागितली होती. विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आमच्या परिचयाचे आहेत. तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ देणार नाही असे भासवले. याबाबत संबंधित महिलेने अँटी करप्शन विभागाकडे तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून सर्व संभाषण कैद केले होते. हे संभाषण जुलै महिन्यात झाले (bribe in name of police inspector) होते.

एसीबीने सापळा लावला :एसीबीच्या सोलापूर युनिटने जुलै महिन्या पासून विजापूर नाका पोलीस ठाणे येथे सापळा लावला होता. संबंधित महिला ही विजापूर नाका पोलीस ठाण्यांकडे वारंवार गेली होती. पण पोलीस निरीक्षकच त्यांना भेटले नाही. अखेर 21 नोव्हेंबर 2022 रोजी युवराज राठोड आणि साजन हावळे यांच्या विरोधात दीड लाख लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.


मांडवली बादशाह :युवराज राठोड हा सतत सोलापुरातील विविध पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसोबत ओळख निर्माण करत होता. पोलीस स्टेशनची सर्व कामे करून देतो. मी मांडवली बादशहा आहे, असे सांगत होता. पोलीस आणि लोकांमधील किचकट कामे करून देऊ असे सांगून पैशांची मागणी करत होता. असे ही म्हटले जाते. अखेर या मांडवली बादशाहवर अँटी करप्शनने टाच आणली असून त्यावर गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. एसीबीचे अधिकारी हे पुढील कारवाईसाठी त्या दोघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली आणि कोर्टात हजर करून अधिक तपास केला जाणार असल्याची माहिती (ACB action) दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details