महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Abu Azmi : अबू आझमींनी केले हिजाबचे समर्थन; तर रणवीर सिंहच्या नग्न फोटोला दर्शवली नापसंती - Ranveer Singh

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याने काही दिवसांपूर्वी न्यूड फोटो शूट केले होते. ते सर्व फोटो एका मॅगझीन मध्ये देखील प्रसिद्ध झाले होते. रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) न्यूड फोटो वरून सोशल मिडियावर अनेकांनी त्याला ट्रोल केले. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (Abu Azmi) अबू आझमी शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. दरम्यान सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी रणवीर सिंहच्या नग्न फोटो बाबत बोलताना म्हणटले की, या सर्व टीव्ही मोबाईलमुळे नग्नता वाढली आहे. चुकीच्या गोष्टींचा विरोध करताना अबू आझमी यांनी हिजाबचे समर्थन ( Abu Azmi supported the hijab) केले.

Abu Azmi while speaking at the conference
पत्र परिषदेत बोलतांना अबू आझमीं

By

Published : Jul 23, 2022, 4:44 PM IST

सोलापूर :बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याने काही दिवसांपूर्वी न्यूड फोटो शूट केले होते. ते सर्व फोटो एका मॅगझीन मध्ये देखील प्रसिद्ध झाले होते. रणवीर सिंहच्या न्यूड फोटो वरून सोशल मिडियावर अनेकांनी त्याला ट्रोल केले. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (Abu Azmi) अबू आझमी शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. दरम्यान सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी रणवीर सिंहच्या नग्न फोटो बाबत बोलताना म्हणटले की, या सर्व टीव्ही मोबाईलमुळे नग्नता वाढली आहे. चुकीच्या गोष्टींचा विरोध करताना अबू आझमी यांनी हिजाबचे समर्थन ( Abu Azmi supported the hijab) केले.

पत्र परिषदेत बोलतांना अबू आझमीं



भारतीय संस्कृतीचे समर्थन :देशातील राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यात आज देखील घुंगट प्रथा आहे. घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करताना तेथील महिला आपला चेहरा दाखवत नाहीत. परपुरुषा समोर त्या महिला आपला चेहरा घुंगटने झाकतात. इस्लाम धर्मात हिजाबची प्रथा आहे. पण या देशात या ना त्या कारणाने हिंदू मुस्लिम वातावरण तयार केले जात आहे. हिजाब मुळे महिलांची सुरक्षा वाढते, पण यालाच न्यायालयात आवाहन देण्यात आले आहे. अशी अनेक उदाहरणे त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आणि हिजाबचे समर्थन केले.



समलैंगिकतेला मुभा तर हिजाबला का नाही :देशात अनेक कायद्यात बदल करण्यात आला आहे. भरतात समलैंगिकतेला मान्यता देण्यात आली आहे. एका महिलेला परपुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याची मुभा आहे. अशा घाणेरड्या कृत्यांना मंजुरी दिली जाते. आणि इस्लाम धर्मातील हिजाबला विरोध केला जातो, हे दुर्दैव म्हणावे लागेल. अशी टीका यावेळी अबू आझमी यांनी बोलताना केली.

हेही वाचा :'हवाई चप्पल' घालणाऱ्यांना 'हवाई प्रवास' घडवणाऱ्या माणसाची चित्तरकथा “सोरराई पोत्रू”

ABOUT THE AUTHOR

...view details