पंढरपूर - धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला दूध आणि चंद्रभागेच्या पाण्याने अभिषेक घालण्यात आला. पडळकरांच्या प्रतिमेला राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांचे हात लागल्यामुळे आम्ही अभिषेक घालून शुद्धीकरण करत असल्याचे यावेळी त्यांचे समर्थक म्हणाले. तसेच पडळकरांच्या जयघोष देखील समर्थकांनी केला.
पंढरपूरमध्ये आमदार पडळकरांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक - gopichand padalkar on sharad pawar
पंढरपूर येथे पडळकर यांच्या समर्थकांनी चंद्रभागेच्या तीरावर आंदोलन केले. तसेच सकल धनगर समाज आमदार पडळकर यांच्या समर्थनात उभा असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
पंढरपूर येथे पडळकर यांच्या समर्थकांनी चंद्रभागेच्या तीरावर आंदोलन केले. तसेच सकल धनगर समाज आमदार पडळकर यांच्या समर्थनात उभा असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले. ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी राज्यातील कारखाने, सहकारी संस्थांमध्ये मोठा भ्रष्टाचार केले आहेत. ते हात पडळकर यांच्या प्रतिमेला लागल्याने ती शुद्ध करण्यासाठी दूध आणि चंद्रभागेच्या पाण्याने हा अभिषेक घालून आंदोलन करत असल्याचे समर्थक म्हणाले. यावेळी धनगर समाजाचे नेते माऊली हळनवार, सुभाष मस्के हे उपस्थित होते.