महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vitthal Sugar Factory : विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपदी अभिजित पाटील तर उपाध्यक्ष पदी प्रेमलता रोंगे - पंढरपूर विठ्ठल सहकारी साखर कारखाना

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अभिजीत पाटील यांची बिनविरोध निवड ( Vitthal Factory President Abhijit Patil ) झाली. तर कारखान्याच्या 45 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला उपाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.

Vitthal Sugar Factory
विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपदी अभिजित पाटील

By

Published : Jul 23, 2022, 4:11 PM IST

पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा समजल्या जाणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ( Vitthal Sugar Factory ) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम गुरुवारी कारखान्यावर पार पडला. निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्यानंतर अध्यक्षपदी अभिजीत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. तर कारखान्याच्या 45 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला उपाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.

इतिहासात पहिल्यांदाच महिलेला उपाध्यक्ष पद - स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गोपाळपूर चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या पत्नी प्रेमलता रोंगे यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. कारखान्याच्या नूतन संचालकांची गुरूवारी कारखाना कार्यस्थळावर निवडणूक निर्णय अधिकारी नागेश पाटील यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. कारखान्याच्या 45 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिला प्रतिनिधी यांना उपाध्यक्ष पदाचा मान मिळाला आहे.

रोलिंग मशीनचे पूजन -कारखान्यावरती कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष च्या निवडीच्या वेळेस कारखान्याच्या रोल मिलचे पूजनही नूतन अध्यक्ष अभिजीत पाटील, डॉ.बी.पी. रोंगे, ह.भ. प.हांडे महाराज,निवडणूक निर्णय अधिकारी नागेश पाटील,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील व सभासदांच्या उपस्थित यांच्या यावेळी करण्यात आलेविठ्ठल कारखाना मागील दोन वर्षांपासून बंद होता. आता एक ऑक्टोबरपासून हा कारखाना सुरू केला जाणार आहे. किमान बारा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याकडून ठेवण्यात आले आहे. गाळप हंगामापूर्वी ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, ऊस वाहतूक ठेकेदारांची थकीत देणी देणार असल्याचेही पाटील यांनी निवडीनंतर जाहीर केले.

आश्वासन पूर्ण करणार -कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीने सत्ताधारी कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके -राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, माजी संचालक युवराज पाटील, गणेश पाटील यांच्या पॅनल चा पराभव केला होता. मागील गळीत हंगामामध्ये कारखाना बंद असल्यामुळे ऊस उत्पादक सभासदांची देणे, वाहतूक ठेकेदारांची देणे, कामगारांच्या पगारी दिल्याशिवाय उसाची मोळी टाकणार नाही, या वर्षीच्या गळीत हंगामातील उसास अडीच हजार रुपये पर्यंत भाव देणार अशा आश्वासन अभिजित पाटील यांनी दिले होते. दिलेल्या आश्वासनाचे पूर्तता करणार असल्याचे मत अभिजित पाटील यांनी सत्करास उत्तर देताना सांगितले. त्यासाठी काही कठोर निर्णय घेणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा -Actress Arpita Mukherjee : अभिनेत्री अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जी यांच्या जवळच्या का मानल्या जातात!

ABOUT THE AUTHOR

...view details