महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aasha Workers Agitation : सोलापुरात आशा सेविकांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले निवेदन - आशा सेविका धरणे आंदोलन सोलापूर

अखिल भारतीय कामगार संघटनांच्या वतीने 28 व 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली होती. ( Workers Fedration Agitation ) या आंदोलनात सर्व कामगार संघटनांनी मोठा सहभाग घेतला. माकप नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्त्वाखाली यंत्रमाग कामगार आणि विडी कामगारांनी विराट मोर्चा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आणला होता. अशाच मागण्या घेत मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला होता. ( Aasha Workers Agitation Solapur )

Aasha Workers Agitation
आशा सेविका आणि गट प्रवर्तक महिलांचे धरणे

By

Published : Mar 29, 2022, 3:31 PM IST

सोलापूर - अखिल भारतीय कामगार संघटनांच्या वतीने 28 व 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली होती. ( Workers Fedration Agitation ) या आंदोलनात सर्व कामगार संघटनांनी मोठा सहभाग घेतला. माकप नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्त्वाखाली यंत्रमाग कामगार आणि विडी कामगारांनी विराट मोर्चा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आणला होता. अशाच मागण्या घेत मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला होता. ( Aasha Workers Agitation Solapur ) पुष्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आशा सेविकांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलक प्रतिक्रिया

हेही वाचा -Nitin Raut on Power shortage : राज्यात मोठ्या प्रमाणात वीज टंचाई; राज्य अंधारात लोटणार नाही - नितीन राऊत

आशा सेविका आणि गट प्रवर्तकाच्या मागण्या -

  1. आरोग्य सेवेत कायम करा
  2. आशा सेविका आणि गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या
  3. आशा सेविका आणि गट प्रवर्तकांना किमान वेतन लागू करा
  4. चार कामगार विरोधी कायदे रद्द करा
  5. कोविड लसीकरण मोबदला, पोलिओ, कुष्ठरोग, क्षयरोग, आरोग्य वार्धिनीचा सर्व थकीत मोबदला मिळावा
  6. 15 जून 2021 च्या संप काळात गट प्रवर्तकाचा कपात करण्यात आलेला मोबदला त्वरित मिळावा
  7. आशांप्रामाणे गट प्रवर्तकांना मोबदला मिळावा
  8. आशांना कुटुंब नियोजनाच्या संदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने आरोग्य किट देण्यात आले आहे. या किटमध्ये रबरी लिंग आहे. ते अतिशय आक्षेपार्ह असून गाव पातळीवर आशा सेविकांना रबरी लिंग दाखवून जनजागृती करता येणे अडचणीचे झाले आहे. त्या आरोग्य किटमधून आक्षेपार्ह वस्तू वगळावी
  9. आशांप्रमाणे गट प्रवर्तकांना कायम नियुक्ती पत्र देऊन पुनर्नियुक्ती पद्धत रद्द करा, अशा अनेक मागण्या घेऊन आशा सेविका आणि गट प्रवर्तकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काम करणाऱ्या आशा सेविका आणि गट प्रवर्तक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details