सोलापूर- मागील 25 दिवसापासून शेतकरी, आंदोलनाच्या लढ्याच्या मैदानात अविरतपणे उरतलेला आहे. सरकारने आंदोलनावर दडपशाही चालवली आहे. यात तब्बल 20 हून शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. तसेच संत बाबा राम सिंग यांनी आत्मआहुती दिली. त्यांचे बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही, त्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातून 5 हजार शेतकरी दिल्लीकडे आगेकूच झालेले आहेत, असे सिटूचे राज्य सचिव युसूफ शेख यांनी सांगितले. आम आदमी पार्टीच्या वतीनेदेखील मौन धारणा करत आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि भारतीय किसान संघाचा निषेध देखील व्यक्त करण्यात आला.
भारतीय किसान संघाचा निषेध
रविवारी (ता. 20) सांयकाळी 6 वाजता चार हुतात्मा पुतळा येथे माकपच्या वतीने आणि आम आदमी पार्टीच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दोन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा घोषित केला. भारतीय किसान संघ या शेतकरी संघटनेने कृषी कायद्याला समर्थन देत, दिल्ली शेतकरी आंदोलनाची घोर चेष्टा करत असल्याचा आरोप करत, त्यांचा आम आदमी आणि माकपने निषेध केला.