महाराष्ट्र

maharashtra

तब्बल 10 वर्षे वेतन नाही, शिक्षकाचे कुटुंबासह घरातच बेमुदत उपोषण

By

Published : Jun 11, 2020, 7:53 AM IST

मागली दहा वर्षांपासून बार्शीतील सुलाखे हायस्कूल येथे अर्धवेळ कायम झालेल्या शिक्षकास पगार देण्यात आला नाही. उलपक्षी त्या शिक्षकाला वेळोवेळ मानसिक छळ देण्यात आल्याने तो शिक्षक कुटुंबियांसह बेमुत उपोषणास बसले आहे.

उपोषणकर्ते
उपोषणकर्ते

सोलापूर - बार्शी एज्युकेशन सोसायटी संचलित सुलाखे हायस्कूलमध्ये कार्यरत आधी अर्धवेळ आणि नंतर कायम झालेले शिक्षक प्रकाश कांबळे यांना त्यांच्या नियुक्ती पासून ते आजपर्यंत म्हणजेच तब्बल दहा वर्षे एक रुपयाचाही पगार मिळालेला नाही. याबाबत शासनाने त्यांचा पगार काढावा, असे आदेश देऊनही बार्शी येथील सुलाखे हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि संस्था प्रशासनाने कांबळे यांचा पगार तांत्रिक त्रुटी ठेवून होऊ दिलेला नाही. त्यामुळे सुलाखे हायस्कूलचे शिक्षक प्रकाश कांबळे हे आपल्या घरी 4 जूनपासून आपल्या कुटुंबासमवेत बेमुदत उपोषणास बसले आहेत.

आपल्या व्यथा मांडताना कांबळे कुटुंबिय
शिक्षक प्रकाश कांबळे हे 15 जून, 2009 पासून अर्धवेळ शिक्षक म्हणून रुजू झाले. ज्यावेळी त्यांचे पगार बिल शासनाकडे पाठविण्याचे आदेश आले त्यावेळी मुख्याध्यापकांंनी त्यांची पगार बिले संदिग्ध किंवा कागदपत्रे शासनाकडून परत येतील अशाप्रकारे पाठवले गेले, अशा प्रकारे त्रास देत जाणून-बुजून गेली अकरा वर्षे प्रकाश कांबळे यांना शाळेत कार्य करूनही कोणताच पगार किंवा मोबदला दिला गेलेला नाही. शिवाय त्यांना मस्टरवर सही करण्यास ही मज्जाव केला आहे. मुख्याध्यापक अनेक प्रकारे त्रास देत असताना या शाळेने शिक्षक असूनही कांबळे यांना एका जागेवर उभे राहण्याची शिक्षाही दिली होती. कांबळे एका जागी उभे आहेत का नाही हे पाहण्यासाठी इतर काही शिक्षकांची नियुक्ती ही मुख्याध्यापक यांनी केली होते, अशी तक्रार कांबळे यांनी या बेमुदत उपोषणवेळी बसताना दिलेल्या निवेदनात केली आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशा प्रकारे शिक्षकांना शाळा किंवा मुख्याध्यापक जाणून-बुजून त्रास देत असतील तर ही चिंतेची बाब आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये बार्शीतील सुलाखे हायस्कूल ही शाळा नेहमीच वादग्रस्त राहिलेली असून याच शाळेचे मुख्याध्यापक पाटकुलकर यांच्यावर शालेय मध्यान्ह भोजन योजनेत अपहार केल्याचा गुन्हाही दाखल झाला आहे. या शाळेतील शिक्षक आपल्या कुटुंबासह बेमुदत उपोषणास बसल्याने पुन्हा एकदा ही शाळा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या बेमुदत उपोषण आंदोलनासंदर्भात या संस्थेचे अध्यक्ष आनंद सुलाखे यांना संपर्क केला असता त्यांनी कोणताही फोन घेण्याचे टाळले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details