महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sensor Goggles For Blind : दहावीतील मुलाने दृष्टिहिनांसाठी बनवले सेन्सर असलेला स्मार्ट चष्मा

सोलापूर जिल्ह्यातील पेनूर ( ता. मोहोळ ) येथील दहावीत शिकणाऱ्या असजद  बागवान या विद्यार्थ्याने दृष्टिहिनांसाठी खास सेन्सर चष्मा आणि काठी बनवली ( Sensor Goggles For Blind ) आहे. असजद मुस्ताक बागवान, असे या मुलाचे नाव आहे. त्याने टाकाऊ वस्तूंचा वापर करत कमी खर्चात ही कामगिरी केली आहे. यामुळे रस्त्याने दृष्टीहीन व्यक्ती चालत असताना काही अडथळे आले तर त्यांच्या हातात असणारी काठी सेन्सॉरच्या मदतीने चष्म्याला बसवलेल्या बझरला संदेश जाते व बझर वाजतो.

असजद
असजद

By

Published : Apr 6, 2022, 4:28 PM IST

सोलापूर- जिल्ह्यातील पेनूर ( ता. मोहोळ ) येथील दहावीत शिकणाऱ्या असजद बागवान या विद्यार्थ्याने दृष्टिहिनांसाठी खास सेन्सर चष्मा आणि काठी बनवली आहे. असजद मुस्ताक बागवान, असे या मुलाचे नाव आहे. त्याने टाकाऊ वस्तूंचा वापर करत कमी खर्चात ही कामगिरी केली आहे. यामुळे रस्त्याने दृष्टीहीन व्यक्ती चालत असताना काही अडथळे आले तर त्यांच्या हातात असणारी काठी सेन्सॉरच्या मदतीने चष्म्याला बसवलेल्या बझरला संदेश जाते व बझर वाजतो.

दहावीतील मुलाने दृष्टिहिनांसाठी बनवले सेन्सर असलेला स्मार्ट चष्मा

या भावनेतून तयार केला सेन्सर चष्मा -असजद हा पेनूर मधील महात्मा गांधी विद्यालयात शिकतो. एक दृष्टिहीन व्यक्ती गावात काठीचा आधार घेत फिरत असताना ती एका विजेच्या खांबाला धडकली. हे असजदने पाहिले. अशा दृष्टिहीन व्यक्तींसाठी काहीतरी करावे, अशी भावना त्याने आपले वर्गशिक्षक रियाज मुजावर यांना बोलून दाखवली. त्यांचे मार्गदर्शन घेऊन टाकाऊ पाईपची स्टिक, लहान वायर, छोटा सेन्सर आणि अंधांसाठी असलेला काळा चष्म्याचा वापर करुन सेन्सर चष्मा तयार केला.

नेत्रहीन व्यक्तीच्या मार्गातील अडथळे लगेच समजणार -नेत्रहीन व्यक्ती चालताना समोर एखादी व्यक्ती, दगड, भिंत व विजेचा खांब, असा कोणताही अडथळा आल्यास लगेच नेत्रहीन व्यक्तीला कळते. काठी कोणत्याही दिशेला वळवली तरी तिथे अडथळा असल्यास त्वरीत आवाज येतो. त्यामुळे नेत्रहीन व्यक्तीला मार्गातील अडथळा ओळखता येतो आणि तो पार करून पुढे जाता येते.

सेन्सर चष्मा बनवण्यासाठी किरकोळ खर्च -सेन्सर चष्मा तयार करताना 300 ते 400 रुपयांचा चष्मा, 200 ते 300 रुपयांची काठी, 500 ते 600 रुपयांचे सेन्सर आणि 50 ते 60 रुपयांची वायर, असा सुमारे एक ते दीड हजार रुपये खर्च येत आहे. भविष्यात दृष्टिहिनांसाठी यापेक्षा अधिक चांगला आणि कमी खर्चात चष्मा तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी असजद बागवानने व्यक्त केली आहे.

हेही वाचा -Mohol Pandharpur Highway Accident : मोहोळ-पंढरपूर मार्गावर थांबलेल्या ट्रकला कारची धडक; पोलीस कर्मचांऱ्यांसह दोघांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details