सोलापूर -सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज 976 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 25 जणांचा बळी कोरोना विषाणूने घेतला आहे. आजपासून सोलापूर शहरासह जिल्ह्यात 15 दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. 'ब्रेक द चैन' अंतर्गत कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. कोरोना विषाणूने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने अखेर नवीन विद्युत वाहिनी सोलापूरच्या स्मशानभूमीत दाखल केली आहे. याबाबत मनपा उपायुक्त धनराज पांडे यांनी माहिती दिली.
हेही वाचा -भाजप नेत्यांकडून त्यांच्या आमदारांना गाजर दाखवण्याचे काम - उपमुख्यमंत्री
शहरात आज 307 नव्या रुग्णांची भर
सोलापूर शहरात आज 307 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यात 171 पुरुष, तर 136 स्त्रियांचा सामावेश आहे. 8 रुग्णांचा कोरोना आजाराने बळी घेतला आहे. मृतांमध्ये 5 पुरुष व 3 स्त्रिया आहेत. शहरात सद्यस्थितीत 3 हजार 772 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.