पंढरपूर (सोलापूर) - जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सोबतच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण देखील वाढले आहे. पंढरपुरात ९० वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. वाखरी कोविड सेंटरमधून कोरोनामुक्त झालेल्या आजोबांना आज डिस्चार्ज देण्यात आला, तर दिवसभरात तालुक्यात ११ कोरोना रुग्ण बरे झाले असून ११ बाधितांची नोंद करण्यात आली. तालुक्यातील रुग्णसंख्या ५३३ वर पोहोचली आहे. तालुक्यात आतापर्यंत २०६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
पंढरीत ९० वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात; तालुक्यातील रुग्णसंख्या ५३३वर - पंढरपूर कोरोना अपडेट
अवघ्या दहा दिवसांच्या उपचारात या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. डॉक्टर, नर्स आणि मेडिकल स्टाफ यांनी टाळ्या वाजवून आजोबांचे अभिनंदन केले.
अवघ्या दहा दिवसांच्या उपचारात या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. डॉक्टर, नर्स आणि मेडिकल स्टाफ यांनी टाळ्या वाजवून आजोबांचे अभिनंदन केले. दरम्यान, कोरोना विषाणूच्या प्रकोपाने आता विठ्ठलाची नगरी धास्तावली आहे. कोरोना संक्रमणासह मृत्यूची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला असून, आतापर्यंतच्या एक महिन्यात बाधित रुग्णांच्या आकडेवारीने उच्चांक गाठला आहे. गुरुवारी पंढरीत ११ कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाचा आकडा ५०० पार केला आहे. कोरोनाचा विळखा विस्तारत असल्याने प्रशासन पुरते हादरले आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यात बुधवारपर्यंत ३७२ कोरोना रुग्णावर उपचार चालू होते. कोरोना बाधितांची संख्या ५३३ वर पोचली आहे. आजपर्यंत २०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे.