पंढरपूर -वारकऱ्यांच्या आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवतांच्या मंदिराच्या संवर्धन विकास कामासाठी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये 74 कोटी रुपयांची तरतूद ( 14 Crore Sanctioned for Vitthal Temple Pandharpur ) केली केल्याची माहिती माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ( Gahininath Maharaj Ausekar ) यांनी दिली. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे ( Neelam Gorhe On Vitthal Mandir ) यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता यांच्या संवर्धन विकासासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत अनेकवेळा बैठका घेतल्या होत्या. तसेच आषाढी एकादशी 2021 कालावधीत त्या पंढरपूर येथे आल्या होत्या व सदरकामी बैठक घेऊन संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सुचना केल्या होत्या व कामांची पाहणी केली होती. संवर्धन विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निधी संदर्भात मागणी करण्यात आली होती.
गहिनीनाथ महाराजांची विनंती -
राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी 202-23 सालचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धन विकास कामासाठी 73 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना परिस्थितीमध्ये विठ्ठल मंदिर पूर्णपणे बंद अवस्थेत होते. त्यामुळे मंदिर समितीचे उत्पादनही त्याकाळात घट झाली. सद्यस्थितीत मंदिर समितीची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने सदर कामास शासनाने निधी मंदिर करून द्यावा, अशी विनंती गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केली होती.