सोलापूर - कोरोनासंदर्भात सोलापुरातून सकारात्मक बातमी आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या 31 जणांनी कोरोनावर मात केली असून या सर्वांना आज घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत सोलापुरातील 72 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी जाण्याची परवानगी मिळाली आहे. तर, काल दिवसभरात कोरोनाचे नवे 2 रूग्ण आढळले असून इतर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सकारात्मक बातमी.. सोलापुरातील 31 जणांनी केली कोरोनावर मात - social distancing
कोरोनाची लागण झालेल्या 31 जणांनी कोरोनावर मात केली असून या सर्वांना आज घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत सोलापूरातील 72 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, काल दिवसभरात कोरोनाचे नवे 2 रूग्ण आढळले. येथील कोरोनाबाधितांची संख्या आता 277 इतकी झाली आहे. तर, आज दोघांच्या मृत्यूंसह मृतांची संख्या 19 इतकी झाली आहे. यात 9 पुरुष आणि 10 महिलांचा समावेश आहे.
सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 277 इतकी झाली आहे. तर, आज दोघांच्या मृत्यूंसह मृतांची संख्या 19 इतकी झाली आहे. यात 9 पुरुष आणि 10 महिलांचा समावेश आहे. आज आसरा सोसायटी आणि शिक्षक सोसायटी येथील प्रत्येकी एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. हा भाग तातडीने सील करण्यात आला आहे. सोलापुरात आत्तापर्यंत 3 हजार 442 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी 3 हजार 231 अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील 2 हजार 954 निगेटिव्ह तर, 277 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. आज एका दिवसात 133 अहवाल प्राप्त झाले. यापैकी 131 निगेटिव्ह तर, 2 अहवाल पॉझिटिव्ह अहवाल आले.
यात एक 52 वर्षीय महिला रविवार पेठ परिसरातील आहे. ती दिनांक 6 मे रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. 11 मे रोजी रात्री तिचे निधन झाले. तर, दुसरी व्यक्ती शिवाजीनगर परिसरातील 71 वर्षीय पुरुष असून 4 मे रोजी ही व्यक्ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आली होती. 12 मे रोजी दुपारी ती मृत्यू पावली. आत्तापर्यंत रुग्णालयातून 72 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, 186 पॉझिटिव्ह रुग्णांवर सोलापुरात उपचार सुरू आहेत. सोलापुरात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या पाहता मोठ्या प्रमाणावर बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.