पंढरपूर - कोरोना विषाणूच्या प्रकोपाने आता विठ्ठलाची नगरी धास्तावली आहे. कोरोना संक्रमणासह मृत्यूची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला असून, आतापर्यंतच्या एक महिन्यात बाधित रुग्णांच्या आकडेवारीने उच्चांक गाठला आहे. बुधवारी पंढरीत ७० कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाचा आकडा ५०० पार केला आहे. कोरोनाचा विळखा विस्तारत असल्याने प्रशासन पुरते हादरले आहे.
विठ्ठलाची नगरी धास्तावली, पंढरपुरात आणखी 70 जणांना कोरोनाची बाधा
पंढरपूर शहर व तालुक्यात ३७२ कोरोना रुग्णावर उपचार चालू आहेत. कोरोना बाधितांची संख्या ५२३ वर पोचली आहे. आजपर्यंत १९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. बुधवारी सरकोलीतील ५२ वर्षीय पुरुषाचा, पंढरपुरातील कदबे गल्लीतील ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पंढरपुरातील रामबाग रोड परिसरात तब्बल २१, झेंडे गल्लीत सहा, बंकटस्वामी मठ परिसरात सहा, डाळे गल्ली, मनिषा नगर, महाद्वार शॉपिंग सेंटर, काळा मारुती मंदिराजवळ, सावता माळी मंदिराजवळ दोन, पद्मावती झोपडपट्टी, कालिका देवी चौक, तानाजी चौक, तिरंगा नगर, गोविंदपुरा, इंदिरा गांधी मार्केट, फुलचिंचोली, करोळे, लक्ष्मी टाकळी येथे प्रत्येकी एक, गांधी रोड, शितल शहा हॉस्पिटलजवळ, परदेशी नगर, संत पेठ येथे प्रत्येकी दोन, घोंगडे गल्लीत पाच, जुनी पेठेत चार, कदबे गल्लीत तीन रुग्ण सापडले आहेत. यामुळे आता प्रशासनाकडून कडक उपाय योजना केल्या जात आहेत.