पंढरपूर (सोलापूर) -येथील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना तपासणी अहवालात गुरुवारी (दि. 6 ऑगस्ट) दिवसभरात 65 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर उपचारानंतर 34 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 684वर पोहोचली आहे. त्यामध्ये 375 जण उपचारानंतर बरे झाले आहेत तर सध्या 280 अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारपर्यंत तालुक्यातील 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पंढरीत कोरोनाचा कहर कायम, 65 नव्या रुग्णांची भर
पंढरपूर शहरात आणि तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सात दिवसांचा लॉकडाउन करण्यात येणार आहे. 7 ऑगस्ट सकाळपासून ते 13 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत पंढरपूर शहरात संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत पंढरपूर शहरातील मंदीर परिसर, प्रदक्षिणा मार्ग या परिसरात व्यापक प्रमाणावर रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात येणार आहेत.

संचारबंदीच्या काळात शहर तसेच ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने युध्दपातळीवर उपाययोजना सुरु केल्या आहेत. यामध्ये बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेणे, तपासणी व उपचार करणे तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करणे यावर भर देण्यात येणार आहे.