महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर : सांगोल्यात 64 लाखाचा गांजा जप्त; सांगोला पोलिसांची कारवाई - 64 लाखाचा गांजा जप्त

महूद ते पंढरपूर रोडवर गायगाव हद्दीत सापळा रचला असताना तेथून एक पिकअप संशयितरित्या आढळून आला. त्या पिकअप थांबून चौकशी केली असता. पिकअप चालकाची वर्तणूक संशयास्पद आढळून आली. पिकअपमधून 64 लाख रुपयांचा गांजासह 71 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सांगोला पोलीस
सांगोला पोलीस

By

Published : Jun 7, 2021, 5:05 PM IST

पंढरपूर (सोलापूर) -सांगोला तालुक्यातील गायगव्हाण हद्दीमध्ये जय तुळजाभवानी हॉटेलच्या समोर अवैधरित्या गांजाची तस्करी करणाऱ्या पिकअपवर मंगळवेढा विभागीय पोलीस व सांगोला पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत 64 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पिकअप चालकासह एकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये 11 पिशव्यामधील 318 किलोग्राम गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी दिली आहे.


64 लाखाचा गांजा जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जून रात्री एकच्या सुमारास हैदराबादवरुन महूदच्या दिशेने पिकअपमधून गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी राजश्री भोसले यांना मिळाली. त्यासाठी पोलीस अधिकारी भोसले यांनी सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह तीन पथके तयार केली. ते तिनही पथके विविध मार्गावर तैनात करण्यात आली. महूद ते पंढरपूर रोडवर गायगाव हद्दीत सापळा रचला असताना तेथून एक पिकअप संशयितरित्या आढळून आला. त्या पिकअप थांबून चौकशी केली असता. पिकअप चालकाची वर्तणूक संशयास्पद आढळून आली. पिकअपमधून 64 लाख रुपयांचा गांजासह 71 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सांगोला पोलीस
मंगळवेढा विभागीय पोलीस व सांगोला पोलिसांची संयुक्त कारवाई

मंगळवेढा विभागीय पोलीस अधिकारी राजश्री भोसले यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे विभागीय पोलिस व सांगोला पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत तीन पथके तैनात केली होती. त्यातील पथकातून या पिकअपवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पिकअपमधून अकरा पांढऱ्या पिशव्यामधून 318 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. 64 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर 6 लाख रुपयांची पिकअपही जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये वाहन चालकासह एकाला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष जगताप करत आहे.

हेही वाचा-भिवंडी पोलिसांनी आवळल्या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details