पंढरपूर - कोरोनाबाधित रुग्णांना खासगी रुग्णालयामध्ये वाजवी दरात उपचार मिळावेतयासाठी शासनाने उपचारासाठी आकारावयाच्या कमाल दराची मर्यादा निश्चित केली आहे. मात्र, अद्यापही काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांकडून निश्चित केलेल्या दरापेक्षा आधिक दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी येत असल्याने नियुक्त केलेल्या लेखापरीक्षण पथकामार्फत शहरातील 15 खासगी रुग्णांलयातील 540 बिलांची तपासणी करुन 7 लाख 3 हजार 700 रुपये कमी करण्यात आले, असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला मान्यता -
तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत. यासाठी प्रशासनाकडून पंढरपूर तालुक्यात 19 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व डेडिकेडेड कोविड हेल्थ सेंटरला मान्यता देण्यात आली आहे.