सोलापूर- कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्याच्या आळंद येथे भीषण अपघात झाला. ट्रक आणि स्कार्पिओ यांच्यात हा अपघात झाला. यामध्ये दक्षिण सोलापूर तालूक्यातील चिंचपूर येथील एकाच कुटूंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये एका नववधूचा मृत्यू झाला आहे. तर पती गंभीर जखमी झाला आहे.
चार महिन्यापूर्वी झालं होतं लग्न, कर्नाटकातील अपघातामध्ये पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर
कर्नाटकातील आळंदजवळ अपघात होऊन सोलापुरातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातामध्ये संजय अशोक चडचण (वय 33), पत्नी राणी संजय चडचण (वय 28), मुलगा श्रेयस संजय चडचण (वय 3) वर्षे हे तिघे जण आणि भाग्यश्री भिमाशंकर आळगी, आणि आणखी 1 असे एकूण 5 जण ठार झाले आहेत. तर भींमाशंकर आळगी हे जखमी झाले आहेत. भाग्यश्री आणि भीमाशंकर यांचा 4 महिन्यापूर्वीच लग्न झाले होते.
चडचण कुटूंबीय हे श्रावण मासानिमित्त दक्षिण भारतातील देवदर्शनासाठी गेले होते. श्रीशैलम, रामेश्वर, तिरूपती बालाजी येथील देवदर्शन घेऊन सोमवारी रात्री चडचण कुटुंबीय कलबूर्गी येथील शरण बसवेश्वरांचे दर्शन घेऊन रात्री परतीच्या प्रवासाला निघाले होते. त्यावेळी गाडी आळंद येथे आली असता हा अपघात झाला.