सोलापूर- सोलापुरात तब्बल ४० लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. नाकाबंदी सुरू असताना सोलापूर शहर पोलिसांना गुटख्याचा ट्रक सापडला.
सोलापुरात ४० लाखांचा गुटखा जप्त; सदर बझार पोलिसांची कारवाई
गुटखा बंदी असताना शहरात येणाऱ्या गुटख्याला लक्ष करत सदर बझार पोलिसांनी ४० लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. शुक्रवारी रात्री नाकाबंदी दरम्यान संशय आल्याने (MH 12 KP 0294) या ट्रकची तपासणी केली. तपासणी दरम्याने त्यात लाखो रुपयांचा गुटखा आढळून आला.
राज्यात गुटखा बंदी असतानासुद्धा अजूनही सर्रासपणे गुटखा विक्री केली जाते. गुटखा खाल्ल्याने अनेक तरुणांना कॅन्सर सारख्या असाध्य रोगाला समोरे जावे लागत आहे. गुटख्यासारखा संवेदनशील विषय ज्या विभागाच्या हाती आहे. त्यांच्या कृपाशीर्वादामुळे शहरातील अनेक पान टपऱ्यांवर सर्रास गुटखा विकला जात आहे. त्यात पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान ४० लाखाच्या गुटख्याची गाडी पकडल्याने शहरातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.
ही कारवाई सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट तसेच पोलीस उपनिरीक्षक कोकरे आणि डीबी पथकाने केली आहे.