सोलापूर- संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक पार पडली होती. यात पंढरपूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील २८, तर श्रावणबाळ योजनेतील ६ प्रकरणे, अशी एकूण ३४ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. अशी माहिती तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी दिली.
निराधारांचे जीवन सुसह्य करण्यासाठी त्यांना शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. संजय गांधी निराधार योजनेमध्ये अपंग, निराधार, दुर्धर आजाराने पीडित व्यक्ती, तसेच ६५ वर्षावरील नागरिकांना श्रावणबाळ योजनेचा लाभ घेता येतो. तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे एकूण ३ हजार १०२, तर श्रावणबाळ योजनेचे १ हजार ९३० लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांचे ऑगस्ट २०२० पर्यंतचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. अशी माहिती तहसीलदार वाघमारे यांनी दिली.