सोलापूर -शहरात संचारबंदीचे कडक पालन करण्यात येणार असून 10 दिवसाच्या संचारबंदीच्या काळात सोलापुरातील व्यक्तींची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यासाठी 30 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत असून सोलापूरकरांनी देखील अँटिजेन टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन महापालिका आयूक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.
लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी तीन शिफ्टमध्ये सोलापूर महापालिकेचे कर्मचारी काम करणार आहेत. संचारबंदीची कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी महापालिका सर्वोतोपरी काम करत आहे. संचारबंदीच्या काळात पोलिसांना सहकार्य करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी हे सहायक म्हणून काम करणार आहेत. सोलापूर शहरात रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यासाठीची जी पथक होती, त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. 30 नविन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.