महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंगळवेढ्यात 25 बेडचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात येणार - दत्तात्रय भरणे - Dedicated Covid hospital announced for mangalvedha

कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत तहसिल कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Corona review meeting
कोरोना आढावा बैठक

By

Published : Apr 24, 2021, 2:46 PM IST

पंढरपूर (सोलापूर) -मंगळवेढा तालुक्यातील कोरोनाबाधित गरीब व गरजू रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये 25 बेडचे सर्व सुविधायुक्त डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक -

कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत तहसिल कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, नगराध्यक्षा अरुणा माळी, पंचायती समितीच्या सभापती प्रेरणा मासाळ, विठ्ठल सह. कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, तहसिलदार स्वप्निल रावडे, गटविकास अधिकारी चव्हाण, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिंदे यांच्यासह तालुक्यातील खासगी रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित होते.

ग्रामीण रुग्णालयामध्ये 25 बेडचे हॉस्पिटल -

कोरोना रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना दिसत आहे. कोरोनाबाधितांना वेळेत उपचार मिळावेत त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयामध्ये 25 बेडचे हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. तसेच खासगी रुग्णालयांनी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू करण्याबाबत प्रस्ताव दिल्यास त्यावर आवश्यकती तत्काळ कार्यवाही करावी. कोरोनाबाधित रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यास प्रशासन आवश्यक उपाययोजना करीत आहे.

नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई -

तालुक्यातील होम आसोलेशनमधील रुग्णांचे प्रमाण कमी करुन त्यांना कोविड केअर सेंटर येथे ठेवण्यात यावे. यासाठी जादाचे कोविड केअरची सेंटर वाढविण्यासाठी कार्यवाही करावी. पोलीस प्रशासनाने संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण रस्त्यावर नागरिक फिरणार नाही याची दक्षता घ्यावी. उल्लघंन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचनाही भरणे यांनी यावेळी दिल्या. कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती प्रांताधिकारी भोसले यांनी यावेळी बैठकीत दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details