सोलापूर- आजवर आपण अनेक वाढदिवस पाहिले असतील, पण सोलापूरच्या मंगळवेढामध्ये साजरा झालेला असा हटके वाढदिवस मात्र आपण पाहिला नसेल. ‘वृक्षो रक्षिति रक्षित:’ या सुभाषिताप्रमाणे उपविभागिय पोलिस कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या २२२ वृक्षांचा आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
२२२ वृक्षांसाठी २२२ किलोंचा केक, मंगळवेढामध्ये वृक्षांचा आगळावेगळा वाढदिवस - वृक्षांचा वाढदिवस साजरा
आपण आजवर अनेक वाढदिवस पाहिले असतील, पण मंगळवेढामध्ये साजरा झालेला असा हटके वाढदिवस मात्र आपण पाहिला नसेल. ‘वृक्षो रक्षिति रक्षित:’ या सुभाषिताप्रमाणे २२२ वृक्षांचा आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
मंगळवेढा येथे वारी परिवारच्या वतीने मागील वर्षी उपविभागिय पोलिस कार्यालयाच्या आवारात २२२ वृक्षांची लागवढ करण्यात होती. या २२२ वृक्षांचा आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. झाडांना फुगे लावण्यात आले होते. वृक्षरोपण आणि संवर्धनासाठीचे फलक देखील लावण्यात आले होते. यावेळी वृक्षांचे खाद्य असलेल्या सेंद्रिय खतांचा २२२ किलोंचा केक कापून या वृक्षांचा वाढदिवस साजरा केला. सोलापूर जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांच्या हस्ते सेंद्रिय खतांचा केक कापून करण्यात आला. त्यानंतर हा केक सेंद्रिय खत म्हणून लावलेल्या झाडांत टाकण्यात आले. यावेळी झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला मंगळवेढा शहर पोलिस स्टेशनचे प्रमुख , पोलिस कर्मचारी तसेच शहरातील प्रमुख मान्यवर व वारी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.