सोलापूर - शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज एका दिवसात तब्बल 22 कोरोनाबाधित आढळून आले असून आतापर्यंत एकूण 330 जण कोरोनाबाधित झाले असून 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आज 22ने वाढून 330 इतकी झाली आहे, तर मृतांची संख्या 1 ने वाढून 22 झाली आहे. आज एका दिवसात 121 जणांचे अहवाल प्राप्त झाले. यात 99 निगेटिव्ह तर 22 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यात 8 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश आहे. एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
आत्तापर्यंत एकूण 3713 जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले. यातील 3481 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 3151 निगेटिव्ह तर 330 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. आज रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्यांची संख्या 22 इतकी आहे, तर केगांव क्वारंटाईन सेंटरमधून 88 जणांना सोडण्यात आले.
या परिसरातील आढळले रुग्ण -
निलमनगर एमआयडीसी रोड येथील 2 महिला,
कोनापुरे चाळ रेल्वे लाईन्स येथील 1 महिला
कुमठा नाका परिसर 1 पुरुष,