पंढरपूर (सोलापूर) -पंढरपूरच्या मुख्य बाजारपेठेत मोबाईल चोरी करणाऱ्या एकाला कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून 2 लाख 17 हजार किंमतीचे 21 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार सतीश कळसकर (रा. पंढरपूर) यांचा मोबाईल पंढरपूर येथील मुख्य बाजारपेठेतून चोरीला गेला होता. त्यांनी मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार पंढरपूर पोलीस ठाण्यात दिली होती. पंढरपूर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला.
दोन लाख 17 हजार रुपये किंमतीचे मोबाईल जप्त
तपासादरम्यान चोरीस गेलेला मोबाईल हा कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात नेटवर्क दाखवत असल्याचे सायबर पोलीस ठाण्याकडून माहिती मिळाली. शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व पथकाकडून कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात जाऊन तपास केला असता. तक्रारदाराचा मोबाईल विधी संघर्षग्रस्त बालकाकडे मिळून आला. हा मोबाईल जप्त करुन विधिसंघर्षग्रस्त बालकाकडे अधिक चौकशी केली असता. दोन लाख 17 हजार किंमतीचे 21 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
हेही वाचा -सोलापूर : कृषी कायद्यांविरोधात कामगार-शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालसमोर धरणे