सोलापूर - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी 28 पैकी 8 उमेदवारांनी माघार घेतल्याने 20 उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे. दरम्यान, युतीच्या बंडखोर शैला गोडसे, वंचित आघाडीचे बंडखोर अनिल बोदाडे, संघर्ष सेनेचे सतिश पाटील आदींनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
हेही वाचा -80 वर्षीय आजोबा विधानसभेच्या रिंगणात, कीर्तनातून मिळणाऱ्या मानधनातून लढवताहेत निवडणूक
महायुतीचे सुधाकरपंत रामचंद्र परिचारक, युतीचे बंडखोर समाधान महादेव आवताडे, काँग्रेसचे प्रा.शिवाजीराव बाजीराव काळुंगे, राष्ट्रवादीचे भारत तुकाराम भालके, वंचित बहुजन आघाडीचे प्रा.दत्तात्रय तात्या खडतरे, बहुजन समाज पार्टीच्या सारिका रामचंद्र सर्वगोड, बहुजन महापार्टीचे सिद्धेश्वर भारत आवारे, बहुजन विकास आघाडीचे अॅड.मारूती कृष्णा अवचारे, अपक्ष संतोष महादेव माने, सुदर्शन रायचंद खंदारे, हनुमंत विठ्ठल बिराजदार, अॅड.शिवलाल कृष्णा लोकरे, प्रा.इंजि.नामदेव शेकाप्पा थोरबोले-पाटील, निशिकांत बंडू पाटील, अब्दुल रउफ जाफर मुलाणी, बिराप्पा मधुकर मोटे, सुनिल सुरेश गोरे, आण्णासाहेब सुकदेव मस्के, बिराप्पा ईश्वर वाघमोडे हे रिंगणात आहेत.
हेही वाचा -सोलापूर : 11 विधानसभा मतदारसंघात 154 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची केंद्रातसह राज्यात आघाडी आहे, मात्र, आघाडीचे नेते आता कोणाच्या प्रचारात दिसणार, तसेच माघार घेतलेले बंडखोर अथवा अपक्ष कोणत्या उमेदवाराच्या व्यासपीठावर दिसणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.