महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर-विजापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत २ युवक ठार

ओमकार शिवानंद मेहता आणि सचिन विश्वनाथ बाळगी हे शनिवारी आज पहाटे विजापूरकडून सोलापूरकडे येत आहे. दरम्यान, त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

अपघात मृत झालेले तरुण

By

Published : Feb 16, 2019, 10:25 PM IST

सोलापूर -विजापूर राष्ट्रीय महामार्गावर सोरेगावनजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये २ युवक ठार झाले आहेत. सोरेगावजवळील काका धाब्याजवळ शनिवारी पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ओंकार शिवानंद मेहता आणि सचिन विश्वनाथ बाळगी अशी मृतांची नावे आहेत.

ओमकार शिवानंद मेहता आणि सचिन विश्वनाथ बाळगी हे शनिवारी आज पहाटे विजापूरकडून सोलापूरकडे येत आहे. दरम्यान, त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये ओंकार आणि सचिन गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मृत ओंकार हे जिल्हा मृदा सर्वेक्षण कार्यालयात कृषी सेवक म्हणून कार्यरत असल्याचे ओळखपत्र घटनास्थळी सापडले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details