महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात कोरोनाचा उच्चांक; आज 2 हजार 44 रुग्णांची वाढ

सोलापुरात आज कोरोना विषाणूने उच्चांक गाठला आहे. आज सोलापुरात 2 हजार 44 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. शहर आणि जिल्ह्यातील 33 पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आज पालकमंत्री सक्रिय झाले.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Apr 25, 2021, 10:11 PM IST

सोलापूर - सोलापुरात आज कोरोना विषाणूने उच्चांक गाठला आहे. आज सोलापुरात 2 हजार 44 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. शहर आणि जिल्ह्यातील 33 पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आज पालकमंत्री सक्रिय झाले. पंढरपूर निवडणुकीमुळे सोलापूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली होती, त्यामुळे फक्त अधिकारीच कोरोना महामारीशी दोन हात करत होते. आजपासून पालकमंत्र्यानी 'ब्रेक द चेन' मोहिमेत उडी घेतल्याने अधिकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

हेही वाचा -दत्तात्रय भरणे यांची कोविड रुग्णालयाला भेट, रुग्णांशी साधला संवाद

सोलापुरातील ग्रामीण भागात आज वाढले 1602 रुग्ण

सोलापुरातील विविध तालुक्यांत कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. ग्रामीण भागात आज 1 हजार 62 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 963 पुरुष व 639 स्त्रियांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या 20 जणांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये 13 पुरुष आणि 7 स्त्रियांचा समावेश आहे. सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण पंढरपूर येथे आढळले आहेत. माळशिरस, माढा, बार्शी मोहोळ येथे देखील कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने झाली आहे.

आज सोलापुरात वाढले 442 रुग्ण

सोलापूर शहरात आज कोरोना रुग्णांनी उच्चांकी गाठली. आज सोलापुरात 442 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 248 पुरुष, तर 194 स्त्रियांचा समावेश आहे. तर, 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 9 पुरुष आणि 4 स्त्रियांचा समावेश आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी शहर आरोग्य प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे, मात्र कोरोना रुग्णसंख्या वाढतच चालली आहे.

हेही वाचा -माढ्यातील सागरचा असाही प्रामाणिकपणा; पैसे आणि कागदपत्रे केली परत

ABOUT THE AUTHOR

...view details