सोलापूर- शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा उद्रेक सुरूच आहे. सोलापुरात आज शुक्रवारी 2 हजार 486 रुग्ण आढळले आहेत. तर 42 रुग्ण उपचार घेत असताना दगावले आहेत. सोलापूरच्या ग्रामीण भागात 2 हजार 147 रुग्ण नव्याने आढळले तर 25 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकीकडे कडक लॉकडाऊन सुरू असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.
शहरातील रुग्ण संख्या दोन दिवसांनी पून्हा वाढली आहे. आज शहरात एकूण 339 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.यामध्ये 195 पुरुष तर 144 स्त्रियांना कोरोना संसर्गजन्य विषाणूची लागण झाली आहे.सोलापूर शहरात आज शुक्रवारी दिवसभरात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 17 रुग्णांनी उपचारादरम्यान दम तोडला आहे.यामद्धे 10 पुरूष व 7 स्त्रिया आहेत. सोलापूर शहरातील विविध रुग्णालयात 2955 रुग्ण उपचार घेत आहेत. तर आजतागायत 1 हजार 118 रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.