महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर: तिहेरी अपघातामध्ये चिमुकलीसह पित्याचा जागीच मृत्यू - father daughter death in Sangola taluka

सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास तीन वाहनांचा पंढरपूर -सांगोला रोडवरील बिलेवाडी येथे अपघात झाला. या अपघात दोघांचा मृत्यू झाला.

वाहन अपघात
वाहन अपघात

By

Published : Jan 13, 2021, 12:26 AM IST

पंढरपूर (सोलापूर) -सांगोला- पंढरपूर रोडवर आयशर टेम्पो, कार आणि दुचाकी या वाहनांचा तिहेरी अपघात झाला. या अपघातात चार वर्षे मुलीसह पित्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वार राजेंद्र निवृत्ती शेटे व स्वरा राजेंद्र शेटे अशी या मृतांची नावे आहेत. दोघेही पंढरपूर येथील रहिवासी होते.

सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास तीन वाहनांचा पंढरपूर -सांगोला रोडवरील बिलेवाडी येथे अपघात झाला. या अपघात दोघांचा मृत्यू झाला. तर दोन अल्पवयीन मुलींसह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. अर्चना राजेंद्र शेटे, समृद्धी राजेंद्र शेटे, नंदिनी राजेंद्र शेटे अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा-सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा शेतकर्‍यांना मोठा दिलासा - शरद पवार

अपघातात दोघांचा जागीच मृत्यू-

पंढरपूर शहरातील विजापूर गल्ली येथील राजेंद्र शेटे व त्यांची पत्नी अर्चना शेट्टी हे आपल्या तीन मुलींसह सांगोला तालुक्यातील हनुमंतगाव याठिकाणी पाहुण्यांना भेटण्यासाठी गेले होते. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ते हनुमंत गाव येथून पंढरपूरच्या दिशेने जात होते. यावेळी शेटे कुटुंबीय बिलेवाडी पाटीलजवळ आले असताना पंढरपूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कार (एमएच 10 सीएक्स- 381) ही पंढरपूरकडून भरधाव येणाऱ्या आयशर टेम्पोला (एमएच 10 एडब्ल्यू 7643) ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी तिहेरी भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, राजेंद्र शेटे व स्वरा शेटे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अर्चना शेटे, समृद्धी शेटे, नंदिनी शेटे या तिघेही मायलेकी गंभीर स्वरूपात जखमी झाल्या आहेत.

कारमधील जखमींची नावे अद्याप समजू शकले नाहीत. सांगोला पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा-आज मुंबईत लस येणार! रात्री 12 नंतर मुंबईसाठी कोल्डस्टोरेज कंटेनर निघण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details