पंढरपूर(सोलापूर)-आषाढी वाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये भक्तांची गर्दी होत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी गर्दी होऊ नये म्हणून 30 जून ते 02 जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वारीसाठी 1 हजार 200 पोलीस आणि 800 होमगार्ड असा फौजफाटा असणार आहे. मानाच्या नऊ पालख्यांना यावेळी परवानगी देण्यात आली आहे. पालखीतील पासधारक वगळता इतरांनी पंढरीत प्रवेश करु नये, असे आवाहन अतिरिक्त पुलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले आहे.
आषाढी वारी: पंढरपुरात 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू... - पुलीस अधीक्षक अतुल झेंडे बातमी
आषाढी वारीत गर्दी पाहायला मिळणार नसली तरी यात्रेची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी शासनाने मानाच्या नऊ पालख्यांना आणि प्रत्येक पालखीसोबत 20 वारकऱ्यांना परवानगी दिली आहे.

यंदा आषाढी वारीत गर्दी पाहायला मिळणार नसली तरी यात्रेची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी शासनाने मानाच्या नऊ पालख्यांना आणि प्रत्येक पालखीसोबत 20 वारकऱ्यांना परवानगी दिली आहे. 30 जून ते 2 जुलै दरम्यान पंढरपूरमध्ये संचारबंदी आणि दहा किमी परिसरात संचारबंदी लागू केली आहे. 2 जुलै रोज मानाच्या नऊ पालख्या परत जाणार आहेत.
संचारबंदीच्या काळात पंढरीत अत्यावश्यक सेवा चालू राहणार आहेत. यामधे दवाखाने, मेडिकल सेंटर चालू असणार आहेत. मंदिर परिसर आणि चंद्रभागा वाळवंटात कोणालाही परवानगी नसणार आहे. त्या ठिकाणी पोलिसांचा चोक बंदोबस्त असणार आहे.