महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पितृपक्ष पंधरवड्याने उमेदवारी अर्ज नाहीत दाखल, 194 जणांनी घेतले 277 अर्ज

जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी 194 जणांनी 277 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. पण, पितृपक्ष पंधरवडा असल्यामुळे केवळ दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

माहिती देताना जिल्हा निवडणूक अधिकारी

By

Published : Sep 28, 2019, 8:07 PM IST

Updated : Sep 28, 2019, 8:15 PM IST

सोलापूर- जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी 194 जणांनी 277 उमेदवारी अर्ज घेतले आहेत, अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. पितृपक्ष पंधरवडा सुरु असल्याने अनेकांनी उमेवारांनी अर्ज देखील घेतले नाहीत.

माहिती देताना जिल्हा निवडणूक अधिकारी

सोलापूर जिल्ह्यातील एकूण 11 विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज वाटप आणि अर्ज स्वीकृतीचे काम सुरू झाले असून सर्व तहसील कार्यालयात अर्ज वाटप व स्वीकृती केली जात आहे. काल शुक्रवारी पहिल्याच दिवशी 11 विधानसभा मतदारसंघासाठी 194 जणांनी 277 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. तर फक्त दोघांनीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अक्कलकोट विधानसभेसाठी गंगाराम कटकधोंड उर्फ वेंकटेश स्वामी यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर पंढरपूर येथे सुदर्शन खंदारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


उमेदवारी अर्ज घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने सोलापूर दक्षिणसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, बार्शीसाठी राजेंद्र राऊत, सांगोल्यासाठी दीपक साळुंखे-पाटील आणि मंगळवेढा-पंढरपूरसाठी समाधान आवताडे आणि शैला गोडसे या प्रमुख उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत.

Last Updated : Sep 28, 2019, 8:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details