महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट; 1719 जणांना कोरोनाची लागण

new cases found in solapur
सोलापूरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

By

Published : Apr 23, 2021, 11:14 PM IST

सोलापूर- शहर आणि जिल्ह्यात आज कोरोनाचा विस्फोट झाला आहे .शहर आणि जिल्ह्यात असे एकूण 1719 जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. ग्रामीणमध्ये तब्बल 1302 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे तर शहरी भागात 417 जण असे एका दिवसात १७१९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 42 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वाढती कोरोना संख्या आणि वाढते मृत्यू दर पाहून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे .एकीकडे शासन वेगवेगळे उपाययोजना करत आहेत मात्र दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढतच चालली आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1302 रुग्ण
सोलापुरातील विविध तालुक्यात एकाच दिवशी 1302 रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर 19 रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. बाधित रुग्णांमध्ये 798 पुरुष आणि 413 स्त्रियांचा समावेश आहे. तर मृत्यू झालेल्यामध्ये 14 पुरुष व 5 स्त्रियांचा समावेश आहे. 889 रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी परतले आहेत. पंढरपूर येथे सर्वाधिक 309 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच माळशिरसमध्ये 244 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे.तर करमाळा,बार्शी ,माढा तालुक्यात देखील कोरोना बधितांचा संख्या वाढली आहे.

शहरात 417 रुग्ण तर 23 बधितांचा मृत्यू
ग्रामीण भागासोबतच सोलापूर शहरात देखील कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. 417 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये 252 पुरुष तर 165 स्त्रिया कोरोनाबाधित आहेत. तसेच २३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 14 पुरूष आणि 9 स्त्रियांचा सामावेश आहे. सोलापुरातील वाढती रुग्ण संख्या पाहता आणखीन कडक निर्बंध लावण्याची गरज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details